मी माझा

profile photo

मैत्रेय श्रीनिवास जोहारी

नमस्कार ...
घरच्यांच्या कृपेने मराठी साहित्याशी माझी नाळ लहानपणापासूनच जोडली गेली. पु.ल., अत्रे, व.पु, भीमसेनजी , वसंतराव, पुरंदरे, शिवाजी सामंत , कणेकर यांसारख्या अनेकांनी नकळत अक्षरशः सख्ख्या आजोबांसारखे माझ्यावर संस्कार केले. प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाल्यावर मी पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यास 'इतिहास' ह्या विषयात केला. गेल्या ९ वर्षांपासून पं. विवेक सोनार यांच्याकडे बासरीचे शिक्षण घेत आहे. झालेल्या संस्कारांमुळे म्हणा वा साथ-संगतीचा परिणाम म्हणा चांगले काय आणि वाईट काय हे कळते (असा माझा समज आहे) असो;  मराठी भाषा जपण्याची आज नितांत गरज आहे. अर्थात तो मक्ता मी घेतलाय अस माझं म्हणणं नाहीये पण कुठेतरी त्याला हातभार लावायची ईच्छा नक्की आहे. वाचकांना दर्जेदार साहित्य मिळालं की आपोआप ते वाचत राहतात , तेच द्यायचा हा प्रयत्न ! खरं तर मी कोणी मोठा साहित्यीक अथवा लेखक नाही पण माझी स्वतःची काही खंबीर मतं आहेत आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा अट्टाहास ...!!

लोभ असावा हि विनंती ...!